जळगाव जिल्हा माहेश्वरी ज्येष्ठ नागरिक संघटनेची त्रैमासिक सभा उत्साहात पडली पार

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव – दि. २७ एप्रिल २०२५, रविवार रोजी श्री महेश प्रगती मंडळ, जळगाव येथे जळगाव जिल्हा माहेश्वरी ज्येष्ठ नागरिक संघटनेची त्रैमासिक मीटिंग संघटनेचे अध्यक्ष श्री श्रीरामजी बेहेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कार्यक्रमाची सुरुवात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हत्याकांडाचा निषेध करून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत करण्यात आली. यावेळी समाजातील इतर दिवंगत सदस्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या सभेला एकूण २२५ सदस्य उपस्थित होते. सभेचे प्रमुख आकर्षण ठरले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणक शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक श्री राजू आमले सर व त्यांचे सहकारी श्री मयूर बुंदे यांचे सायबर सुरक्षिततेवरील मार्गदर्शन. त्यांनी अत्यंत उपयुक्त व सोप्या भाषेत ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाच्या उपाययोजना समजावून सांगितल्या.

कार्यक्रमात श्री केदारभाऊ मुंदडा यांनी जुलै महिन्यात नियोजित प्रयागराज, वाराणसी, अयोध्या व चित्रकूट येथील सहलीविषयी माहिती देऊन सदस्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. या सहलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सभेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात जन्मदिवस असलेल्या सदस्यांचा सन्मान सत्कार करून त्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून विशेष क्षण साजरे करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोविंद सोमानी (सचिव) यांनी केले. ईश्वरलाल लाठी (कोषाध्यक्ष) यांनी संस्थेच्या खर्चाचा सविस्तर अहवाल सादर केला. उपाध्यक्ष डॉ. रमेश लाठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्री प्रदीप बेहेडे व सौ. मंगला बेहेडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन केले.त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post