मराठवाडा संवाद 2025 मध्ये "मराठवाडा अ‍ॅडव्हर्टायझर” या संस्थेला ‘सर्वोत्तम जाहिरात संस्था’ सन्मान गौरव पुरस्कार ; रमेश कोंदलकर यांचा मा. मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते गौरव

मराठवाडा अ‍ॅडव्हर्टायझर” ला ‘सर्वोत्तम जाहिरात संस्था’चा पुरस्कार!

खबर महाराष्ट्र न्यूज | पराग काथार | छ. संभाजीनगर

 मराठवाडा विभागात जाहिरात क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या “मराठवाडा अ‍ॅडव्हर्टायझर” या संस्थेला लोकशाही मराठी आयोजित ‘मराठवाडा संवाद 2025’ या भव्य कार्यक्रमात “सर्वोत्तम जाहिरात संस्था” म्हणून सन्मानित करण्यात आलं.

हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री श्री. अतुल सावे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख श्री. रमेश कोंदलकर यांना प्रदान करण्यात आला.

रमेश कोंदलकर हे जाहिरात विश्वातील एक सन्माननीय आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, डिजिटल व इव्हेंट मीडिया या सर्वच क्षेत्रांत त्यांनी नावीन्यपूर्णतेचा परिचय देत जाहिरात उद्योगात नवा आदर्श निर्माण केला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांची ओळख एक विश्वासार्ह, विनम्र आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेत्याची आहे. त्यांनी आपल्या कार्यातून हजारो लोकांशी दृढ नातं तयार केलं असून, "जाहिरात हे व्यवसायाचं हृदय आहे" हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं आहे.

हा सन्मान केवळ त्यांच्या कार्याची पावती नसून, संपूर्ण मराठवाडा विभागासाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे.


----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------


Post a Comment

Previous Post Next Post