✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – जळगावमधील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित वहनाचा उत्सव हा १५४ वर्षांची परंपरा लाभलेला धार्मिक सोहळा आहे. कार्तिक एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रथोत्सवात दररोज काकड आरती, महाअभिषेक व वहनाची मिरवणूक या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.
या पारंपरिक उत्सवात काथार वाणी फ्रेंड्स सर्कल ग्रुपतर्फे समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. भक्तगणांसाठी ५० कॅरेट केळी व ५० लिटर दुधाची चहा वाटप करून भाविकांना प्रसन्न अनुभव देण्यात आला. या उपक्रमाद्वारे फ्रेंड्स सर्कल संस्थेने धार्मिक वातावरणात मानवतेचा संदेश दिला.
कार्यक्रमावेळी कंठहार समाजाचे माजी अध्यक्ष श्री. विजय वाणी संतोष वाणी, रमेश कोंदलकर तसेच फ्रेंड्स सर्कल संस्थेचे भालचंद्र वाणी, भूषण हरणे, मनोज वाणी, दीपक वाणी, श्रीकृष्ण बाविस्कर, निलेश बाविस्कर आणि योगेश वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच जिद्दी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य करून उपक्रम यशस्वी केला.
रथाचे स्वागत फुलांनी करण्यात आले असून, सर्व मान्यवरांनी श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती श्री. मंगेश महाराज व श्रीराम महाराज यांचे आशीर्वाद घेतले. भक्तीभाव, उत्साह आणि समाजसेवेच्या वातावरणात रात्री बारा वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------