Breaking News; महाराष्ट्रात आज निवडणूक तारखांची घोषणा होणार, महत्त्वाची माहिती समोर


✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – हाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतील, अशी माहिती आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता असून त्यानंतर ग्रामपंचायत आणि इतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. प्रभाग रचना आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण यांसारख्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवरून या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर आज पहिल्या टप्प्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायती, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.


कधी होऊ शकतात निवडणुका?

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन केलं आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026 च्या आत पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. नगरपालिका व नगरपंचायतींसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी डिसेंबरमध्ये मतदान होईल, अशी शक्यता आहे. अतिवृष्टी व पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागात मदतकार्यात व्यस्त असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीपूर्वी सुमारे 10 दिवस आधी महापालिका निवडणुका पार पाडल्या जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पुढीलप्रमाणे:
महापालिका - 29
नगरपंचायती - 246
जिल्हा परिषद - 42
पंचायत समिती - 32
एकूण - 336
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post