✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – जळगाव शहरातील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित पारंपरिक श्रीराम रथउत्सवात संध्याकाळच्या वेळी मोठ्या गर्दीचा फायदा घेत काही अटळ महिला चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांच्या वाट्या आणि मणी चोरून महिलांना लुबाडले होते. परंतु जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने केवळ काही तासांत या महिलांच्या चोरीचा उलगडा करत आरोपींना अटक केली असून सुमारे ₹40,000 किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
🕕 घटना तपशील :
दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 ते 8.00 वाजेदरम्यान जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात अन्नदाता हनुमान मंदिराजवळ श्रीराम रथ उभा राहिल्याने मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिला चोरट्यांनी काही महिलांच्या गळ्यातील ₹77,500 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून चोरी केली.
पीडित महिलांनी तात्काळ जळगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केली.
👮♂️ पोलिसांची तातडीची कारवाई :
तक्रार प्राप्त होताच मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोध पथक तयार करण्यात आले.
सफौ सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून दाणाबाजार परिसरात रवाना करण्यात आली. संशयित महिलांवर बारकाईने लक्ष ठेवून तपास सुरू करण्यात आला.
🔍 संशयित महिला अटकेत :
तपासादरम्यान पथकाने काही संशयित महिलांना ताब्यात घेत त्यांच्या अंगझडतीतून खालीलप्रमाणे सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला :
₹12,000 किमतीच्या दोन सोन्याच्या वाट्या – वजन 1.870 ग्रॅम
₹4,000 किमतीचे चार सोन्याचे मणी – वजन 0.680 ग्रॅम
₹9,000 किमतीची एक सोन्याची वाटी – वजन 1.460 ग्रॅम
₹9,000 किमतीची मध्यम आकाराची सोन्याची वाटी – वजन 1.460 ग्रॅम
₹6,000 किमतीची लहान आकाराची सोन्याची वाटी – वजन 0.950 ग्रॅम
एकूण जप्त मुद्देमाल : ₹40,000
⚖️ कायदेशीर कारवाई :
या प्रकरणात जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 377/2025, भा.दं.वि. कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
👏 उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी :
या कारवाईत गुन्हे शोध पथकातील पुढील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग आहे —
सफौ सुनिल पाटील, पोहेकॉ नंदलाल दशरथ पाटील, पोहेकॉ विरेंद्र शिंदे, पोहेकॉ भगवान पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, पोहेकॉ योगेश पाटील, पोकॉ भगवान मोरे, पोकॉ अमोल ठाकूर, पोकॉ प्रणय पवार, मपोकॉ हर्षदा सोनवणे, मपोकॉ जयश्री मराठे आणि मपोकॉ मोनाली राजपुत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------