सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणाऱ्या या नाटकाचा केंद्रबिंदू माणसाच्या सनातन वृत्तीवर भाष्य करण्याचा आहे. मानवी जीवन संघर्षाशिवाय अपूर्ण आहे, हे अधोरेखित करणारे हे नाटक आहे.
प्रा. पुरुषोत्तम सरपोतदार या उच्चभ्रू साहित्यिक आणि समाजातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व तसेच सामान्य वर्गातील अनिकेत यांच्यातील संघर्षावर आधारित हे नाटक आहे. नीती-अनीती, मानवाच्या कृतींचा परिणाम आणि सर्वसामान्य माणसाची होरपळ याचे प्रभावी चित्रण यात आहे. वृत्तपत्रातील बातम्यांच्या माध्यमातून उलगडणारे हे नाट्य प्रसंगागणिक उत्कंठा वाढवते.
तांत्रिक आणि सर्जनशील टीम:
लेखन: डॉ. हेमंत कुलकर्णी
दिग्दर्शन: अपूर्वा कुलकर्णी
कलाकार: ऋषिकेश धर्माधिकारी, अम्मार मोकाशी
नेपथ्य: रसिका कुलकर्णी
प्रकाशयोजना: लेखराज जोशी
पार्श्वसंगीत: आशिष राजपूत
रंगभूषा: योगेश शुक्ल
वेशभूषा: हर्षल पवार
रंगमंच व्यवस्था: किरण म्हस्के, प्रसाद कौतिकवार, बापू महाले
या नाटकासाठी तिकीट दर अनुक्रमे रु. १५ व रु. १० निश्चित करण्यात आले आहेत. जळगावकर रसिकांनी नाटकाला हजेरी लावून त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सादरकर्ती संस्था रंगशाळा जळगाव यांनी केले आहे.
स्थान: छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव
वेळ: सायंकाळी ७ वाजता
प्रस्तुती: रंगशाळा, जळगाव
नाटकाचा आस्वाद घ्या आणि विचारांना चालना द्या!
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
नाटक