खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव, ११ नोव्हेंबर:
जळगाव शहरातील भाजपचे महायुतीचे उमेदवार राजुमामा भोळे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने केली आहे. प्रचारातील पहिल्या टप्प्यात त्यांनी राम मंदिरात नारळ फोडून शुभारंभ केला आणि त्यानंतर शहरातील विविध भागांत संपर्क मोहिमेला सुरूवात केली. या दौऱ्यांत राजुमामांनी आपल्या जळगावकर मतदारांशी संवाद साधला, तसेच कोणताही पक्ष, जात, धर्म, किंवा वर्ग न पाहता सर्वच नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या पाच दिवसांत झालेल्या या दौऱ्यांमध्ये त्यांनी श्रीकृष्ण कॉलनी, हरीओम नगर, सम्राट कॉलनी, गुलाबबाबा कॉलनी, महाबळ परिसर, आणि जुने जळगाव अशा अनेक भागांत प्रचार रॅली काढून नागरिकांची भेट घेतली. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या या प्रचार शैलीने प्रेरित झाले असून भाजपसाठी प्रचारात झोकून देत आहेत. राजुमामांच्या सभांना आणि रॅलींना नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत भाजपचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजुमामा यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यानिमित्ताने जळगाव शहरात मोठ्या सभा आणि कॉर्नर सभा घेण्याची तयारी सुरु झाली आहे. महायुतीतील इतर नेतेही लवकरच त्यांच्या सभांमध्ये सामील होणार असल्याचे कळते, ज्यामुळे विरोधकांवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------