अपक्ष उमेदवारावर गोळीबार प्रकरण ; बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोन जणांच्या मुसक्या आवळल्या.

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे विनोद नामदेव सोनवणे, रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर, यांच्या प्रचार रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३५ वाजता, राजुर ता. बोदवड गावाजवळ, राजुर-नांदगाव मार्गावर, सोनवणे यांचे इंडीव्हर गाडी क्रमांक MH १९ CF ११९१ दिशेने अज्ञात हल्लेखोरांनी सुमारे १० ते १५ फुटांवरून दोन गोळ्या फायर केल्या व घटनास्थळावरून फरार झाले.

या प्रकरणी अजय राजेंद्र भंगाळे, वय २७, व्यवसाय चालक, रा. रुईखेडा, ता. मुक्ताईनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक २२९/२०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ६१(२), ३(५), आर्म अॅक्ट क. ३/२५, म.पो.का.क. १३५ अन्वये गुन्हा नोंदवला गेला असून तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे करीत आहेत.

तपासादरम्यान पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित १) दिपक दादाराव शेजोळे, वय २२, रा. येवती, ता. बोदवड, व २) आयुष उर्फ चिकु गणेश पालवे, वय १९, रा. नांदगाव, ता. बोदवड यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, गावठी कट्टा व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदर घटनेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले असून तपास सखोल सुरू आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post