आमदार भोळेंचे जळगावकर मतदारांना "आभार" मतदारांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची मेहनत विजयाची "गुरुकिल्ली"


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली तेव्हापासून तर २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या दिवसापर्यंत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. वाढते मतदान हे या सर्वांच्याच मेहनतीचे फळ आहे. अहोरात्र मेहनत करून प्रचारात सहभाग नोंदविला व जनतेपर्यंत आजवर झालेले काम पोचवले. निकालात मिळणारे यश तुम्हा सर्वांचेच असल्याचे म्हणत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी मतदान संपल्यानंतर सायंकाळी सात वाजता जीएम फाऊंडेशन भाजपा कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात जळगावकरांचे आभार मानले.  

बुधवारी जळगाव शहरात जळगावकरांनी मोठ्या संख्येने मतदान केले. यात महिलांचा टक्का अधिक दिसून आला. या सर्वांचेच प्रेम आणि आशीर्वाद नक्कीच विजयी करतील असा विश्वास आमदार भोळे यांनी वर्तविला. ज्या प्रमाणे गेल्या महिन्याभरापासून प्रचारात पदाधिकारी व कार्यकर्ते फिरून मेहनत घेत होते. त्याचे फळ नक्कीच मिळेल.बुधवारी मतदानानंतर विश्रांती न घेता आमदार भोळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. ज्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतली, ज्यांनी जिवाचं रान करून या निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. यासोबतच ज्या ज्या समाजांनी पाठींबा दिला असे सर्व समाजबांधव, हॉकर्स, संघटनांचे पदाधिकारी व संपूर्ण जळगाव शहरातील मतदारांचे आभार मानून ऋण व्यक्त केले. याप्रसंगी भाजप महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, सचिन पानपाटील, महेश जोशी, उदय भालेराव,जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम उपाध्यक्ष प्रकाश बालाजी, गवाडे गटाचे राजेंद्र मोरे, रिक्षा युनियन चे दीपक सपकाळे, जिल्हा प्रसिद्ध माध्यम प्रमुख मनोज भांडारकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post