खबर महाराष्ट्र न्युज, गोंदिया (प्रतिनिधी): गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज (दि. २९) नागपूरहून गोंदियाकडे येणारी शिवशाही बस भीषण अपघातग्रस्त झाली. अर्जुनी ते गोंदिया रोडवर खजरी आणि डव्वा गावाजवळ बस रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून ३० ते ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जखमींना तत्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. जखमींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीची घोषणा:
राज्य सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिला आहे. तसेच जखमींवर मोफत व दर्जेदार उपचारांची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अपघाताचे कारण:
या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्रारंभिक तपासानुसार बसचालकाचा ताबा सुटल्यामुळे बस उलटली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रभावित भागातील नागरिकांची मदत:
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. प्रशासनाने दुर्घटनेतील प्रवाशांना मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्याचेही निर्देश दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------