गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी बंजारा तांड्याचा निर्धार: पारंपरिक गीतांतून व्यक्त केला आदर.



खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव, ५ नोव्हेंबर: जळगाव जिल्ह्यातील बंजारा तांडा वासियांनी नेते गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ ठाम निर्धार व्यक्त केला आहे. "गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर" या उद्गारांद्वारे बंजारा तांडा वासियांनी पाटील यांना विजयी करण्याची प्रतिज्ञा केली आहे. पाटील यांनी तांड्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले असून, तांडा वासियांनी त्यांना तांड्यांचे खरे संरक्षक मानले आहे.

तांड्यांच्या विकासासाठी दिला भरघोस निधी, पाणीपुरवठा योजना आणि सुविधांचा विस्तार

जळगाव जिल्ह्यातील विविध तांड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना, रस्ते, बससेवा, सेवालाल महाराज भवनांची उभारणी, ग्राम पंचायत कार्यालये, आणि प्राथमिक सोयी-सुविधांसाठी पाटील यांनी मोठा निधी मंजूर केला आहे. त्यांनी अनेक तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून तांडा वासियांचे जीवन सुलभ करण्यास विशेष लक्ष दिले आहे. यामुळे तांड्यांमध्ये विकासाची नवी गती मिळाली असून पाटील यांचे तांड्यांप्रती असलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे.

बंजारा महिलांचे पारंपरिक स्वागत

बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीतांनी गुलाबराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे झालेल्या या सोहळ्यात महिलांनी भावपूर्ण गीतांद्वारे पाटील यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला. बंजारा समाजातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या प्रचार रॅलीत सहभागी होत गुलाबराव पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

गुलाबराव पाटील यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, आणि इतर महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तांड्यावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post