जयश्रीताईंचा ‘हम सब एक है’ चा नारा; मास्टर कॉलनीत सर्वधर्मीय स्वागताने वाढला प्रचाराचा रंग.

खबर महाराष्ट्र न्युज, जळगाव | विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला जोर येत असताना, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील प्रचाराचा प्रारंभ संतोषी माता मंदिर येथे केला. पुढे मास्टर कॉलनीत त्यांनी सर्वधर्मीय एकोप्याचे प्रतीक म्हणून ‘हम सब एक है’ चा नारा दिला आणि परिसरातील नागरिकांचे मन जिंकले.

जयश्रीताईंनी यावेळी नागरिकांना शहराचा विकास, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षा, आणि सर्वधर्मसमभाव यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर मत देण्याचे आवाहन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हासमोर बटण दाबून मतदान करण्याची विनंती त्यांनी केली. परिसरातील महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, तर जयश्रीताईंनी महिलांशी संवाद साधला आणि ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले.

यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे किरण राजपूत, अशोक लाडवांजरी, मुकुंद सपकाळे, जयाताई तिवारी, गायत्रीताई सोनवणे, माजी नगरसेविका पार्वताबाई भिल्ल, नीताताई सांगोडे, मनीषाताई पाटील, सुनील भाऊ माळी, किरण भावसार, प्रमोद नाईक, शाम तायडे, झाकीर शेख, डॉ. सईद शाह, दानीश खान, एहफास खान, रज्जाक शाह, फिरोज मुलतानी यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post