"२३ तारखेनंतर मंत्री होऊनच मेहरुणमध्ये या” राजुमामा भोळे यांना मेहरून येथील नागरिकांचा आशीर्वाद.


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शुक्रवारी सकाळी मेहरुण परिसरात भव्य प्रचार रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून भोळे यांचे प्रेमळ स्वागत केले. इच्छादेवी चौकात इच्छादेवी मंदिरात पूजा-अर्चना करून देवीचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला.

रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पंचशील नगर, गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा, गुलाब बाबा कॉलनी, भीलवाडा, कुंभारवाडा, जय जवान चौक, अक्सा नगर आणि दत्तनगर मार्गे रामनगरपर्यंत मार्गक्रमण करत पुढे गेली. रॅलीच्या समारोपात तांबापुरा भागातील हजरत बिलाल चौकात ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आ. भोळे यांचा भावपूर्ण सत्कार केला.

मेहरुणमधील श्री विठ्ठल मंदिर, भवानी माता मंदिर आणि महादेव मंदिर येथे पूजा-अर्चना करून भोळे यांनी विजयासाठी साकडे घातले. गोपीनाथराव मुंडे चौकात महिला भगिनींनी औक्षणाने स्वागत केले आणि “२३ तारखेनंतर मंत्री होऊनच मेहरुणमध्ये या,” असा आशीर्वाद दिला.

मुंडे चौकातील साईबाबा मंदिरात नागरिकांनी शाल आणि श्रीफळ देऊन भोळे यांचा सत्कार केला. रॅलीमध्ये माजी नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षांचे प्रमुख नेते, तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि फुलांच्या वर्षावात भरगच्च प्रचार रॅलीने जळगावमध्ये महायुतीच्या ताकदीचा प्रत्यय दिला.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post