खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी : चहा भारतातला कि भारतात कसा आला हा मोठा विषय असला तरी चहा शिवाय दिवस सुरु होतो अशी माणसे विश्वात कदाचित क्वचितच सापडतील . अशा या ' चाय की दुनिया में ,' नमो भारत ' या उद्योग समूहाच्या 'नमो भारत चहा ' या कडक चहाचे दमदार पदार्पण झाले आहे. या चहा प्रॉडक्टचा लॉन्चिंग प्रोग्राम नुकताच जळगाव येथे दि. १२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.सोयो एनर्जी , सोयो सिस्टिम्सचे संचालक श्री. किशोर ढाके यांच्या शुभ हस्ते या प्रॉडक्टचे लॉन्चिंग (प्रारंभ )करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. दत्ता पोटे , एमआयडीसी पोलीस स्टेशनचे श्री. किरण पाटील,प्रचिती मीडियाचे संचालक श्री. सचिन घुगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सध्या विविध ब्रॅंड्सचे अनेक चहा प्रॉडक्ट बाजारात आहेत. पण अनेक व्हरायटींसहित विविध वैशिष्ट्यांसह आलेला नमो भारत चहा , निश्चितच सर्व वर्गातील चहाप्रेमींमध्ये प्रथम पसंतीचा होईल असा विश्वास मान्यवर व उपस्थितांनी 'नमो भारत चहा ' ची चव चाखल्यानंतर व्यक्त केला .
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------