प्रजाशक्ती कांती दलाच्या वतीने राज्यातील मतदारांसाठी चार प्रमुख मागण्या महायुतीकडे मांडण्यात आल्या आहेत. या मागण्यांमध्ये शेतमजुरांची गणना करणे, त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे, सरकारी दवाखाण्यांची २४ तास सेवा सुरू ठेवणे आणि शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करणे या लोकाभिमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसंदर्भात महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, विजयानंतर त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन निरिषभाऊ महाजन यांनी दिले.
यावेळी प्रजाशक्ती कांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोक तायडे म्हणाले की, “महायुतीचे सरकार हे गोरगरीबांचे सरकार असेल. लाडकी बहीण योजना माय-माऊलींसाठी संजीवनी ठरेल. प्रजाशक्ती कांती दलाच्या ३ लाख ५० हजारांहून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांसह आमचे पदाधिकारी महायुतीच्या समर्थनार्थ पूर्ण ताकदीने काम करतील आणि महायुतीला भरघोस मताधिक्याने विजयी करतील.”
या कार्यक्रमाला संघटनेचे राष्ट्रीय सचिव अॅड. सतीश मोरे, राज्य अध्यक्ष डॉ. अमोल बावस्कर, महिला अध्यक्षा ज्योती पवार, मराठवाडा विभागीय अध्यक्ष भजनु पठाण, उपाध्यक्ष अशोक कराळे, विदर्भ विभागीय अध्यक्ष कैलाश निघोट, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कोकण विभागीय अध्यक्ष धम्मपाल ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अॅड. समीर तडी, महानगर अध्यक्ष प्रा. पंकज सपकाळे, गहिनीनाथ वाघ, गजानन काळे, रावत पडोक, रेहाना शेख, कविता बोरडे, मीलिंद जाधव, किशोर शिंदे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीच्या या पाठिंब्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रजाशक्ती कांती दलाच्या सक्रिय सहभागामुळे महायुतीच्या विजयाची शक्यता अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
भाजपा शहर