परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज.


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे यावल/रावेर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर, वनोली (ता. यावल) येथे होणार आहे. साईचरणी श्रद्धा व सबुरीचा ध्यास घेत या ठिकाणी विकासाचा संकल्प सिद्ध करण्यात येणार आहे. या वेळी अनिल चौधरी मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

शुभारंभानंतर, श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिरात नारळ फोडल्यानंतर अनिल चौधरी दुपारी ४ वाजता न्हावी येथे कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करतील. यावेळी यावलचे माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, तुकाराम बारी, हाजी हकीम शेठ, आलिम शेख, दिलीप कोळी, माजी नगरसेवक बिलाल शेख, संभाजी सोनवणे, विकास पाटील, गणेश बोरसे, योगेश निकम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रहारचे यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे यांनी या कार्यक्रमासाठी परिवर्तन महाशक्ती आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि मतदारांना श्री तीर्थक्षेत्र साईबाबा मंदिर, वनोली येथे दुपारी ३ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post