खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : शहरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वेग येत असून, काल (दि. ६) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिला मतदारांनी "जयश्रीताई तुम आगे बढो"च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आणि जयश्री महाजन यांना नारीशक्तीचा भक्कम पाठिंबा असल्याचे दर्शवले.
प्रभाग क्र. १० मधील खंडेराव नगर, आझानगर या भागातून निघालेल्या रॅलीत महिलांनी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे स्वागत केले आणि शहराच्या नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. जयश्री महाजन यांनी महिलांशी संवाद साधत आपला विकासात्मक दृष्टिकोन सांगितला. रॅलीतील महिला समर्थकांनी शहराचे नेतृत्व महिलेकडे देण्याचा निर्धार व्यक्त केला आणि मशाल चिन्हालाच मत देण्याचे वचन दिले. महिलांच्या मोठ्या उपस्थितीने रॅलीला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले.
सायंकाळी हुडको भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महानगर अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख जाकीर पठाण यांनी जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत जयश्री महाजन यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या विकासात्मक दृष्टिकोनाबद्दल माहिती दिली आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे आश्वस्त केले. या सभेला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------