देवकर आप्पांची प्रचार रॅली नव्हे जणू विजयी मिरवणूकच; ममुराबाद गाव दत्तक घेण्याची ग्वाही.

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचार रॅलीला ममुराबाद-विदगाव भागात प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही रॅली नव्हे, तर जणू विजयी मिरवणूकच भासली. ठिकठिकाणी नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहाने देवकर यांचे स्वागत केले. काही ठिकाणी त्यांची घोड्यावरून मिरवणूकही काढण्यात आली, ज्याने संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले.

गुलाबराव देवकर यांनी ममुराबाद, विदगाव, धामणगाव, आवार, तुरखेडा, खापरखेडा, नांद्रा खुर्द, डिकसाई, रिधूर, घार्डी, आमोदा, करंज, नंदगाव, नांद्रा बुद्रुक आदी गावांमध्ये प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि संधी मिळाल्यास या समस्यांवर तातडीने काम करण्याची ग्वाही दिली. ममुराबादच्या नागरिकांनी देवकर यांना त्यांच्या प्रचारासाठी एक लाख रुपयांची वर्गणी देखील जमा करून सुपूर्त केली.

या रॅलीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक मनोज चौधरी, दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ. अरुण पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विविध गावांतील ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांनीही देवकर यांना पाठिंबा दर्शविला.

ममुराबाद गाव दत्तक घेण्याची ग्वाही

प्रचार रॅलीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना अभिवादन केले. दत्त मंदिर चौकात नागरिकांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना, देवकर यांनी सेवेची संधी मिळाल्यास ममुराबाद गाव दत्तक घेऊन त्याचा विकास साधण्याचे आणि चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post