प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे (राजू मामा) उद्या करणार प्रचाराची सुरुवात.


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे (राजू मामा) उद्या, मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी आपला प्रचार प्रारंभ करणार आहेत. प्रचाराची सुरुवात जळगाव शहरातील ग्रामदैवत प्रभु श्रीराम मंदिर (जुने जळगाव) येथे सकाळी ७.३० वाजता प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन व नारळ फोडून करण्यात येईल. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात.

 केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात येईल. प्रचार प्रारंभाच्या वेळी प्रभु श्रीराम मंदिर (जुने जळगाव) येथे सकाळी ७.३० वाजता प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

प्रचारयात्रेची सुरुवात जळगाव शहरातील मंडल क्र. २ प्रभाग ३, ४, ५ येथून होईल. प्रचार यात्रा जुने जळगाव राम मंदिरापासून कोल्हे वाडा, बौद्ध विहार, चौधरी वाडा, बाल क्रीडा व्यायाम शाळा, विठ्ठल पेठ, तेली चौक, भावसार मढि, गुरव यांच्या घराकडून, डॉ. अवधूत चौधरी यांच्या घराकडून, बदाम गल्ली, भाग्यलक्ष्मी टेंट चौक, जुना नशिराबाद रोड, बनकर वाडा, पांझरापोळ चौक, विजय बारी फोटोग्राफर, स्व. नरेंद्र अण्णा यांच्या वखार, भवानी पेठ, भोई गल्ली, महाले प्रोव्हिजन, अवधूत व्यायाम शाळा, अण्णा भोईटे यांच्या गल्ली, बागवान चौक, पतंग गल्ली, डी.के.टेलर, तेली पंच भवन, जयेश भावसार यांच्या घरासमोरून, रथ चौक, अमित भाटिया यांच्या घरासमोरून, बोहरा गल्ली, सागर भवन, राजकमल चौक, पोलन पेठ, अशोकटॉकीज गल्ली, सुभाष चौक, आर.सी. बाफना समोरून, भवानी मंदिर, सराफ बाजार, बालाजी पेठ मित्र मंडळ, कैलास सोनवणे यांचे ऑफिस, त्रिपाठी व्यायाम शाळा, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, विश्वास लुंकड ज्वेलर्स, मरी माता मंदिर, भिलपुरा चौक, चौबे शाळा, अंबाजी मेटल, रमेश किराणा गल्ली, जामनगरी, दत्त मंदिर, दाणाबाजार (चैतन्य मेडिकल समोरील भाग), सौ. चित्रा मालपाणी यांच्यासमोरुन जात दुपारी समाप्त होईल.

दुपारनंतर प्रचारयात्रेचा दुसरा टप्पा मंडल क्र. ४, ६ प्रभाग ७, ११ येथे शिव कॉलनी स्टॉप पासून सुरू होईल. या टप्प्यात हनुमान मंदिर शिव कॉलनी, स्व. विनायक सोनवणे यांचे घर, गट नं ५३, ५४, ५५, ६०, आशा बाबा नगर, गजानन महाराज मंदिर, पंडितराव कॉलनी, प्रकाश गजाकुश यांचे घर, टेलिफोन टॉवर परिसर, रेल्वे लाईन, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर, धनगर वाडा, शाह बाई रेशनिंग दुकान, हनुमान मंदिर, गोरख महाराज गल्ली, प्रभु विश्वकर्मा मंदिर, दुर्गा माता मंदिर, बाजार चौक, कैलास हटकर यांचे घर, शनीदेवता मंदिर, बसस्टॉप परिसर, राजीव गांधी नगर, श्रीधर नगर येथे समारोप होणार आहे.

या प्रचार कार्यक्रमाला महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
----------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
-----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post