खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : दीपोत्सवाच्या निमित्ताने जळगाव शहराचे आमदार राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी १ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी आमदार भोळे यांच्या सहकुटुंब माजी महापौर सीमा भोळे, मुलगा विशाल भोळे, सुन डॉ. जुही भोळे, आणि मोहित भोळे देखील उपस्थित होते.
या भेटीत शहरातील सर्वांगीण विकासाची चर्चा करण्यात आली. जळगाव शहरात कोणत्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, याबाबत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी वडिलधारी मार्गदर्शन केले.
आ. राजूमामा भोळे यांनी या मार्गदर्शनाचे मोल ओळखत असे स्नेहबंध आणि आशीर्वाद जळगाव शहराच्या भावी विकासासाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
----------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
-----------------------------------
Tags
ग्रेट भेट