खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच शहरासाठी योग्य व्यक्तिमत्वाची निवड व्हावी याकरिता श्री समस्त जळगाव बारी पंच आणि श्री नागवेल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे विशेष मतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मतदानाचे महत्त्व पटवून देणे हा होता.
या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष उज्जवलाताई बेंडाळे, श्री समस्त जळगाव बारी पंच अध्यक्ष अरुण बारी, श्री नागवेल प्रतिष्ठान अध्यक्ष लतीश बारी हे उपस्थित होते. याशिवाय ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस विजय बारी, उपाध्यक्ष मयूर बारी, समाजसेवक अतुल भाऊ बारी, नगरसेविका शोभाताई बारी, समाजसेविका मंगलाताई बारी, तसेच समाजातील इतर प्रमुख व्यक्ती आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार भोळे यांनी शहराच्या विकास कामांबाबत समाजबांधवांना सविस्तर माहिती दिली आणि या कामात त्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या वेळी भाजप पदाधिकारी व बारी समाजाचे इतर कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. तसेच, उपस्थितांना मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले आणि सर्वांनी निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान, उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मतदान प्रक्रियेतील योगदानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी व विकासासाठी योग्य व्यक्तिमत्व निवडण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारावर आहे, असे विचार मांडले.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
बारी समाज मेळावा