दुपारी खोटे नगरातून सुरू झालेल्या या रॅलीत विविध वयोगटातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जयश्री महाजन यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, तर जयश्री महाजन यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रॅलीच्या दरम्यान जयश्री महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधताना आपल्या संकल्पना मांडल्या. "जळगावचा सर्वांगीण विकास हे माझे प्रमुख ध्येय आहे. शिक्षिका म्हणून मला वेळेचे आणि शिस्तीचे महत्त्व कळले आहे, आणि तीच शिस्त मी राजकारणात पाळणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन," असे ठामपणे सांगत त्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वासन दिले.
रॅली दरम्यान खोटे नगर परिसरातील नागरिकांनी जयश्री महाजन यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. उपस्थित नागरिकांनी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त केला आणि जळगावच्या प्रगतीसाठी त्यांना योग्य उमेदवार मानले. विकासाच्या आश्वासनाने प्रभावित झालेल्या नागरिकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.
या प्रचार रॅलीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांत प्रचंड जोश निर्माण झाला आहे. रॅलीत सहभागी कार्यकर्ते जयश्री महाजन यांच्या विजयासाठी गावोगावी जाऊन प्रचार करणार आहेत. शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जयश्री महाजन यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहेत. महाविकास आघाडीचा हा एकजुटीचा निर्धार आणि नागरिकांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, जळगावच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------