खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे मतदान दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी सदैव देश ,धर्म, व राष्ट्रासाठी शिंपी समाजा हा पुढे असतो याच अनुषंगाने आपले राष्ट्रीय पर्व म्हणून लोकशाहीचं महत्त्व पटवून देण्यासाठी शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप कला संस्कृती सभागृह येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी समस्त शिंपी समाज व श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था ,अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र , तसेच शहरातील संतनामदेव संस्कार फाउंडेशन, स्वयम् स्फूर्त संस्था, प्रिंपाळा शिंपी समाज ,शिवाजीनगर , महाबळ , शिव कॉलनी आशा बाबा ,कांचन नगर ,वाघनगर ,लक्ष्मीनगर खेडी परिसर शाखेच्या वतीने व शहरातील विविध भागातील शाखा अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष व संस्थेच्या वतीने मतदान जनजागृती पर मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याला समाजाध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी सर्व समाजाला आव्हान केले की मतदान करणे आपले आद्य कर्तव्य असून शिंपी समाजा हा सदैव देश धर्म व राष्ट्रासाठी कार्य करणारा समाज असून याच अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरातील 165000 समाज बांधवांचे 100% मतदान करून घेण्याचा निर्धार या प्रसंगी संस्थेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाला अ भा क्षत्रिय नामदेव महासंघाचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांना शपतीद्वारे सर्वांना शंभर टक्के मतदान मी करणार व करून घेणार अशी शपथ दिली कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी विवेक जगताप अनिल खैरनार मुकुंद मेटकर संजय जगताप गंगाधर बागुल चेतन पवार अशोक सोनवणे केतन मेटकर चार्ली शिंपी संदीप सोनवणे दिलीप सोनवणे सुरेश सोनवणे ऋषिकेश शिंपी जितेंद्र शिंपी हेमंत शिंपी सुमित अहिराव प्रशांत सोनवणे प्रमोद कापुरे सौ रूपाली निकुंभ सविता बोरसे विद्या सोनवणे भाग्यश्री जगताप दिलीप भामरे शैलेंद्र सोनवणे सुरेश बागुल अजय चव्हाण राजेंद्र सोनवणे संजय अहिराव यास असंख्य समाज बांधव युवक कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
विधानसभा 2024