महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांची मॉर्निंग "वॉक पे चर्चा" उद्याने आणि रिंगरोड परिसरात नागरिकांशी संवाद साधत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन



जळगाव (प्रतिनिधी) : शहरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी आज (दि. ६) पहाटे शहरातील विविध ठिकाणी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला. महात्मा गांधी उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, रिंगरोडवरील पु. ना. गाडगीळ शोरूम समोरील मैदान, तसेच बहिणाबाई उद्यान येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली व त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

यावेळी नागरिकांच्या अडचणी, शहरातील विविध समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीचे मशाल चिन्ह समोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करीत जयश्री महाजन यांनी महाविकास आघाडीला मत म्हणजे शहराच्या सर्वांगीण विकासाला मत असल्याचे सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post