13 वर्षांखालील बास्केटबॉल निवड चाचणी संपन्न.


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या अधिपत्याखाली नियुक्त करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीतर्फे दिनांक 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे महाराष्ट्र संघासाठी 13 वर्षांखालील मुला-मुलींची बास्केटबॉल निवड चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील 4 मुले आणि 4 मुलींची निवड करण्यासाठी आज, 8 नोव्हेंबर 2024, शुक्रवार रोजी, पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानावर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

निवड चाचणीचे उद्घाटन एम.एम. महाविद्यालयाचे व्हाईस चेअरमन नानासाहेब वि. टी. जोशी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. बी. एन. पाटील, प्राचार्य श्री. शिरीष पाटील, क्रीडा संचालक प्रा. श्री. गिरीश पाटील, तसेच जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव श्री. जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

निवडलेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत:

मुले:

समर्थ अहिरे

भाग्येश पाटील

ब्रिजेश पाटील

विनायक आहुजा


मुली:

आरोही पाटील

वीरा जोशी

वरदा चौधरी

लिशिका गायकवाड


या निवड प्रक्रियेत प्रा. श्री. गिरीश पाटील, श्री. आशिष पाटील, श्री. जावेद शेख, श्री. भावेश पाटील, आणि श्री. जितेंद्र शिंदे यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post