खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव ग्रामीण : सोनवद आणि पिंप्री पंचायत समिती गणांतील निंभोरा, दहिदुला, चिंचपुरा, मुसळी, वाघळूद, अंजनविहीरे, हनुमंतखेडा, पिंपळेसिम, बोरखेडा, आणि चिंचपुरा या भागांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या भागातील विविध विकासकामांमुळे गुलाब भाऊंनी जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सिंचन बंधारे, नदीवरील पूल, शेत पानंद रस्ते, ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अशा प्रकल्पांद्वारे विकासाचे नवे मापदंड निर्माण करण्यात आले आहेत.
पर्यटनाला प्रोत्साहन आणि सर्वसमावेशक विकास गुलाबराव पाटील यांनी वाघळूद तीर्थक्षेत्रासाठी निधी देऊन पर्यटनाच्या दृष्टीने या क्षेत्राचा विकास केला आहे. त्यांनी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन, सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन एकात्मिक विकास साधला आहे. या एकजुटीच्या दृष्टिकोनामुळे त्यांची लोकप्रियता वाढत असून, जाती-पातीला थारा न देणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
संपूर्ण परिसरात गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद पिंप्री पंचायत गणांतील सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी गुलाबराव पाटील यांच्या विकासकामांना ठोस पाठींबा दिला आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत धनुष्यबाण आणि भगवे झेंडे लावून सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोशात 'धनुष्यबाणाचा' प्रचार करताना दिसत होते, आणि प्रचंड मतांनी विजय मिळवण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
ग्रामस्थांचा ठाम निर्धार
गुलाबराव पाटील यांना विजय मिळवून देण्याचा संकल्प या प्रचारामध्ये सरपंच सुरेश पाटील, सुदर्शन पाटील, भैय्या पाटील, कैलास पाटील, सुखदेव पाटील, सुरेश गुंजाळ यांच्यासह उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य एकत्र आले. त्यांनी मताधिक्याने गुलाबराव पाटील यांना विजयी करण्याचा ठाम संकल्प व्यक्त केला.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची प्रचारामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती प्रचारात महायुतीचे भाजपाचे पी. सी. आबा पाटील, सुभाष आप्पा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, शिवसेनेचे संजय पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, रॉ. काँ. चे श्यामकांत पाटील, नाटेश्वर पवार, दिनेश पाटील, राजू पाटील, माजी सभापती अनिल पाटील, प्रेमराज पाटील, रवींद्र पाटील, नाना बोरसे, शिवदास कुमावत, सरिता ताई कोल्हे, राधेश्याम पाटील, संतोष पाटील, समाधान पाटील आदींनी गुलाबराव पाटील यांना ठाम पाठींबा दर्शविला.
या भव्य प्रचार रॅलीने परिसरातील ग्रामस्थांना जोश दिला असून, गुलाबराव पाटील यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्व मतदारांतून एकसंध समर्थन मिळताना दिसत आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------