खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: जळगाव नगरीचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय सुरेशदादा जैन यांच्या जन्मदिवसाचा उत्सव त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
माजी महापौर जयश्री सुनिल महाजन आणि माजी मनपा विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा जन्मदिवस साजरा केला. या प्रसंगी त्यांनी सुरेशदादांच्या कार्याचा गौरव करत, जळगावच्या विकासात त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.
कार्यक्रमात रत्नाभाभी जैन, नितीनभाऊ लढ्ढा, शरद तायडे, विजय वाणी, मेजर नाना वाणी, जयाभाभी जैन, युवासेनेचे अमित जगताप, विराज कावडिया, पियुष गांधी, विशाल वाणी यांसह अनेक सहकारी उपस्थित होते.
सुरेशदादा जैन यांचे मार्गदर्शन:
जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरेशदादांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी सामाजिक ऐक्य, विकासाची आवश्यकता, आणि युवापिढीला सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या सल्ल्याने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
जळगाव नगरीच्या विकासाचा पायाभूत खांब ठरलेल्या सुरेशदादांच्या या सन्मानाने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
वाढदिवस