खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद भूषवावे, या उद्देशाने भाजप जिल्हा महानगरच्या वतीने आज (दि. २८) संध्याकाळी ६ वाजता गोलाणी मार्केट येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरती आयोजित करण्यात आली.
या महाआरतीचे विधिवत पूजन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रभू श्रीराम आणि श्री हनुमंताचा जयघोष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष सौ. उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, अमित भाटिया, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक, महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाआरतीदरम्यान फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा उल्लेख करत आगामी काळात पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर श्री हनुमान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------