मतदार संघाचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास; जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रचार रॅलीदरम्यान गुलाबराव देवकर यांनी विकासाचे संकल्प व्यक्त केले.

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली, कडगाव, शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीला ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात देवकर यांनी ग्रामीण जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.

गुलाबराव देवकर यांनी भादली, शेळगाव, कडगाव, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे, कानसवाडे आदी गावांमध्ये प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. त्यांनी महिलांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे हित आणि बेरोजगारांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील पंचसूत्री योजनेची माहिती दिली. या प्रचार रॅलीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकुळ चव्हाण, डॉ. अरुण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय नारखेडे, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, शेळगावचे माजी सरपंच हरीष कोळी, रामा कोळी, निवृत्ती कोळी, कानसवाडे येथील सरपंच संजय कोळी, माजी उपसरपंच सुकदेव कोळी, भोलाणेचे सरपंच नितीन सपकाळे, कडगावचे मुरलीधर कोळी आणि पंढरीनाथ कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेळगाव बॅरेजचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करणार

जळगावहून शेळगावमार्गे यावलकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने राज्यमार्ग तयार करण्यात आला आहे, परंतु तापी नदीच्या पात्रात शेळगाव बॅरेजच्या खाली दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. देवकर यांनी सेवा मिळाल्यानंतर या पुलाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, शेळगाव बॅरेजचे पाणी जळगाव तालुक्यातील शेतीसाठी खेळवून कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातील. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.

गुलाबराव देवकर यांच्या या प्रचार रॅलीने ग्रामीण मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांचा मतदारसंघातील प्रभाव अधिक बळकट झाला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post