खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : राज्यात महायुतीच्या सर्वांचा निवडून आणण्यासाठी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव जिल्हा आयोजित करण्यात आला फैजपूर येथे होणाऱ्या सभेसाठी गृहमंत्री अमित शहा हे रविवारी दुपारी जळगाव विमानतळ येथे आले असता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस अमित भाटिया, उपाध्यक्ष प्रकाश बालाणी, विजय वानखेडे, संपर्कप्रमुख विक्रम तरसोडिया, जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर, कार्यालय प्रमुख प्रकाश पंडित, माजी नगरसेवक अमित काळे, पितांबर भावसार, मनोज बाविस्कर, रवींद्र सोनवणे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी गुलापुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. प्रसंगी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सद्गुरु वामनराव पै यांचे पुस्तक भेट स्वरूपात दिले. गृहमंत्री अमित शहा यांचे दुपारी फैजपूर येथे जे टी महाजन मैदानावर कार्यकर्त्यांना संबोधित करणारी सभा आयोजित करण्यात आली होती. गृहमंत्र्यांचा उत्तर महाराष्ट्रातील हा पहिला दौरा होता. यावेळी ते मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, संजय सावकारे यांसह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता आले होते.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------