भाजपने घेतला कठोर निर्णय: बंडखोरांवर कारवाई, पक्षाच्या शिस्तभंगाच्या कारवाईत ४० कार्यकर्त्यांची हकालपट्टी


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षविरोधात भूमिका घेतलेल्या बंडखोर कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली आहे. पक्षाचे आदेश न मानल्यामुळे महाराष्ट्रातील ४० कार्यकर्त्यांना भाजपने हकालपट्टी केली आहे. जळगाव शहरातील मयूर कापसे आणि आश्विन सोनवणे यांचा यामध्ये समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीतील अनेक बंडखोरीचे प्रकार पाहायला मिळाले. त्यात भाजपचे सर्वाधिक बंडखोर समोर आले. पक्षाचे आदेश पाळून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर या ४० कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केली.

कारवाई झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे

धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
अकोट – गजानन महाले
वाशिम – नागेश घोपे
बडनेरा – तुषार भारतीय
अमरावती – जगतीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद गडरेल
साकोली – सोमदत्त करंजेकर
आमगाव – शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
घणसांवगी – सतीश घाटगे
जालना – अशोक पांगारकर
गंगापूर – सुरेश सोनवणे
वैजापूर – एकनात जाधव
मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
बागलान – आकाश साळुंखे
बागलान – जयश्री गरुड
नालासोपारा – हरिष भगत
भिवंडी – स्नेहा पाटील
कल्याण – वरुण पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू
अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
नेवासा – बाळासाहेब मरकुटे
सोलापूर – शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनिल बंडकर
श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
सावंतवाडी – विशाल परब

या कठोर कारवाईने राज्यभरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post