खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उद्या, मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात होणार आहे. या कार्यक्रमात श्रीफळ फोडून प्रचाराची सुरुवात होईल. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते ऍड. जयप्रकाश बाविस्कर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
प्रचार रॅलीचा पहिला टप्पा प्रभाग क्रमांक ६ मध्ये शाहू नगर, जेडीसीसी बँक कॉलनी, पोलीस ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट, पोलीस मुख्यालय गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या ठिकाणी फिरणार आहे.
दुपारी तीन ते सात या वेळेत दुसरा टप्पा गोलाणी मार्केट आणि फुले मार्केट या प्रमुख व्यापारी ठिकाणी प्रचारासाठी राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी, आजी-माजी मनसैनिक, अंगीकृत संकटाचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांना सकाळी ८.३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहरातील निवडणूक प्रचार कार्यालयाजवळ जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रचार रॅलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना समर्थन देणार आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
----------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
-----------------------------------