जळगावकरांच्या प्रेमाने आमदार सुरेश भोळेंचे "हॅट्रिक' ८७ हजाराची आघाडी राखत विरोधकांचा केला दणदणीत पराभव


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : दहा वर्षांपूर्वी ३६ वर्षांचा इतिहास बदलून जळगाव शहराने सुरेश भोळे या नव्या चेहऱ्याला आमदार पदाची संधी दिली. या दहा वर्षात आमदार भोळे यांनी विकासकामे तर केलीच मात्र जनमानसात सर्वसामान्य माणसाप्रमाणे वावरत नागरिकांच्या समस्या देखील समजून घेतल्या. जळगावकरांच्या मनात हक्काची जागा निर्माण केल्यामुळेच सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून जनतेने निवडून दिले. यंदाच्या निवडणुकीत आमदार भोळे हे तब्बल ८७ हजार ५०३ मतधिक्याने निवडणून आले असून सर्वात मोठा विजय समजला जात आहे.  

आमदार राजूमामा भोळे यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं मनमिळाऊ असल्याने आपसूकच लोक त्यांच्याशी लवकर जोडले जातात. मातीमध्ये घट्ट पाय रोवून स्वाभिमानाने ताठ मान घेऊन जळगावातील सामान्यातल्या सामान्य माणसांच्या मनात त्यांनी आपली भक्कम जागा निर्माण केली आहे. शहर असो वा ग्रामीण, गरीब असो वा श्रीमंत अशी कोणतीच भिंत न ठेवता समाजाशी एकनिष्ठता ठेवत लोकांच्या दुःखात आधारवड बनून तसेच त्यांच्या सुखात आनंदात सहभागी होतात. एखादं लग्नकार्य असो वा भजन संध्या असो अनेक कार्यक्रमांना ते न चुकता हजेरी लावतात. यामुळे त्यांनी तळागाळातील जनमानसात आपले नाव कोरले आहे. शहराच्या विकासात योगदान दिले असून जळगाव शहरात अनेक वर्षांनंतर सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पूल, एलईडी लाईट लावून शहराचा चेहरा बदलला असून यांसारख्या अशा कितीतरी न सांगता येणाऱ्या गोष्टी आमदार राजूमामा भोळे यांनी केल्या. यातून त्यांचे जळगाव प्रतीचे असलेले प्रेम दिसून येते.

या कामांनी दिली शहराला ओळख
- जळगाव शहराला सुंदर बनवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या.
- काश्मीर सारखा गंभीर प्रश्न असलेल्या हुडकोचं कर्ज फेडून जळगाव महानगरपालिकेला कर्जमुक्त केले.
- समाजात सलोखा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांसाठी हक्काची सर्व सुविधायुक्त घरे बांधून दिली.
- शिवाजीनगर उड्डाणपूल
- रिंगरोड वरील उड्डाणपूल
- शहरातून जाणारा महामार्ग
- रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी
------
भाजपने गड कायम राखला
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर सुरेश भोळे यांनी अभिषेक पाटील (राष्ट्रवादी) यांचा ६४,८४६ मतांनी पराभव केला होता. भाजपला एकूण १,१३,३१० मते मिळाली होती, तर उपविजेत्याला ४८,४६४ मते मिळाली होती. २०२४ च्या निवडणुकीत आमदार सुरेश भोळे यांना १,५१,५३६ मते मिळाली. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार माजी महापौर जयश्री महाजन यांना ६४ हजार ३३ मते मिळाली. प्रतिस्पर्धीच्या तुलनेत ८७ हजार ५०३ मतांनी आमदारांनी आघाडी मिळविली.  
---------
या समाजबांधवांनी दिले दिला पाठींबा
अखिल भारतीय मराठा महासंघ, चितोडगड बहुउद्देशीय संस्था, समस्त बारी पंच मंडळ, भोई समाज युवा फाउंडेशन, राष्ट्रीय लाहुशक्ती, प्रजाशक्ती क्रांती दल, देवांग कोष्टी समाज जळगाव, त्वष्टा तांबट समाज विकास मंडळ, संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र, श्री संत नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित नंदूशेठ जगताप शिंपी समाज युवा फाउंडेशन, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज, महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्वभाषिक, जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशन, वुलन मार्केट असोसिएशन, खंडेलवाल समाज व पाथरवट समाज महासंघ जळगाव, कंठहार वाणी समाज.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
-----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post