शूर ‘जंजीर’चा गौरवशाली प्रवास संपला — जळगाव पोलीस दलातील सेवेतून सन्मानपूर्वक निवृत्त; पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम भावनिक वातावरणात पार

✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – जळगाव जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकात कार्यरत असलेला शूर आणि दक्ष ‘जंजीर’ हा श्वान आज सन्मानपूर्वक सेवामुक्त झाला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मा. पोलीस अधीक्षक श्री. सो. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक देविदास वाघ, तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे, आणि पोहेकॉ संदीप परदेसी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्वान ‘जंजीर’चा जन्म 18 नोव्हेंबर 2017 रोजी झाला होता. त्यानंतर त्याने गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे 9 महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. 7 एप्रिल 2018 पासून तो जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत राहिला आणि आपल्या निष्ठा, शौर्य व सूक्ष्म सूंघण्याच्या क्षमतेने अनेक गुन्हे उकलण्यात मोलाची भूमिका बजावली.
आपल्या सेवाकाळात ‘जंजीर’ने चाळीसगाव, MIDC, भुसावळ शहर आणि इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये आरोपींचा माग काढून पोलिसांना महत्त्वाची मदत केली. त्याच्या कौशल्यामुळे अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे सापडले आणि गुन्हेगारांना न्यायाच्या कचाट्यात आणता आले.
सेवानिवृत्ती समारंभादरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी ‘जंजीर’ला फुलमाळा अर्पण करून सन्मानित केले. उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू तरळले.
----------------------------------


आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post