जळगाव (प्रतिनिधी) – दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शिरसोली प्रन येथील सादिक सिराज पिंजारी (वय 41) हा त्याच्या घराच्या आवारात जिवनावश्यक गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करत असल्याचे आढळले. या साठ्यामुळे मानवी जीवनाला धोका पोहचण्याची शक्यता होती.
तत्काळ कार्यवाही करत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरसोली येथे छापा टाकला. छाप्यात, सादिक सिराज पिंजारी हा भारत, एच.पी. आणि इंडियन गॅस कंपनीचे एकूण 73 नग घरघुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरसह आढळून आला. त्याच्याकडे एक अॅपे रिक्षा (क्रमांक MH-19 BM 2784), गॅस भरण्याचे मशीन व नळ्या यांचा समावेश होता. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 5,29,600 रुपये आहे.
सदर प्रकरणी सादिक सिराज पिंजारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम, पोउपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, अधिकार पाटील, पोहेका विजय पाटील, हरीलाल पाटील, पोकों प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे आणि शुद्धोधन ढवळे यांनी केली. यामध्ये पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांचे विशेष सहकार्य लाभले.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम करीत आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------