खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
जळगाव प्रतिनिधी, जिमाका दि. २८-०९-२०२४ रोजी जळगांव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे मा. ना. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
सर्व न्यायाधीश वृंद, वकिल वृंद, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजुचे पक्षकार यांचे मदतीने ४०८६ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १०३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये १९,४९,७९,९०९/- वसुल करण्यात आले. दिनांक २३/०९/२०२४ ते दि. २७/०९/२०२४ पर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७१० प्रकरणे निकाली काढण्यात आली.
मा. श्री एम.क्यु.एस.एम. शेख, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगांव, साो. जळगांव यांचे सदरहु राष्ट्रीय लोकअदालत मध्ये यश प्राप्ती करण्याकरीता विषेश मार्गदर्शन लाभले.
सदर लोकअदालत मध्ये प्रामुख्याने सर्व मा. जिल्हा न्यायाधीश यांचे सहकार्य लाभले. मा. एस. एन. राजुरकर, जिल्हा न्यायाधीश-१ जळगांव, मा श्री एस. पी. सय्यद, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव, अध्यक्ष अॅड श्री रमाकांत पाटील, जिल्हा वकिल संघ जळगांव, उपाध्यक्ष अॅड श्री. अनिल पाटील, जिल्हा वकील संघ जळगांव, अॅड श्री. कल्याण पाटील, सचिव, जिल्हा वकील संघ, जळगांव, श्री. एस. जी. काबरा, जिल्हा सरकारी अभियोक्ता, पॅनल न्यायाधीश श्री बी. एस. वावरे, जिल्हा न्यायाधीश-२, श्री शरद आर. पवार- जिल्हा न्यायाधीश-३ जळगांव, श्रीमती एस. एस. घारे ३ रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जळगांव, श्री एम. एस. बढे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर जळगांव, श्रीमती एस. व्ही, मोरे ५ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जळगांव, श्रीमती एम. पी. जसवंत ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर जळगांव, श्रीमती. डी. ए. सरनायक ६ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जळगांव, लोकअभिरक्षक कार्यालय प्रमुख अॅड अब्दुल कादीर व त्यांचे सहकारी, पॅनल अॅडव्होकेट श्री. अजय प्रकाश पाटील, अॅड श्री. संदीप गोकुळ पाटील, अॅड श्रीमती ऐश्वर्या
चंद्रशेखर मंत्री, अॅड श्रीमती प्रितीबाला तुकाराम ठाकरे, अॅड लिना अनिल म्हस्के, अॅड श्रीमती ब्टिकल जितेंद्र यादव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन प्र. अधिक्षक श्री. बी. के. मोरे, कनिष्ठ लिपीक श्री. आर. के. पाटील, श्री. प्रमोद बी. ठाकरे, श्री गणेश निंबोळकर, श्री. हर्षल नेरपगारे, श्रीमती जयश्री पाटील, श्री. संतोष एस. तायडे, श्री. पवन पाटील, श्री. रणवीर राणा, श्री प्रकाश काजळे, श्री. जावेद पटेल, श्री. सचिन पवार तसेच समांतर विधी सहायक निलेश महिंद्रे आदिंनी कठोर परीश्रम घेवुन लोक अदालत यशस्वी केली.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------