'मुख्यमंत्री वयोश्री योजना' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन.


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
राज्यातील ६५ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर बनविणे आणि वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर आवश्यक उपाययोजना करून त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे हा आहे.
पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहायभूत साधने व उपकरणे खरेदी करता येतील. यामध्ये चश्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी उपकरणांचा समावेश आहे.

योजनेसाठी पात्रतेचे निकष

१. लाभार्थ्यांचे वय दिनांक ३१/१२/२०२३ रोजी ६५ वर्ष पूर्ण केलेले असावे.

२. लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाखा च्या आत असावे.

योजनेचा लाभ घ्यावयासाठी आवश्यक कागदपत्रे 

आधारकार्ड, कोर बँकिंग सुविधा

असलेल्या बँकेचे आधार संलग्न बचतखाते पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, दोन

प्रकारचे स्वयंघोषणा पत्र (उत्पन्नाबाबत व दुबार लाभ न घेतल्याबाबत),

आरोग्य शिबिरांचा कालावधी

 जळगांव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन १३ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.

आरोग्य शिबिराचे ठिकाण 
 जळगांव महापालिका क्षेत्रासाठी हे शिबीर

१) अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.
२) जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव
३) जळगांव महानगरपालिकेची सर्व रुग्णालये

ग्रामीण क्षेत्रासाठी हे शिबीर

१. शासकीय ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा रुग्णालये
२. नगरपालिका व नगरपरिषदेची सर्व रुग्णालये.


जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिनस्त असलेली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी विनामूल्य शिबीरात आरोग्य तपासणी करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. योगेश पाटील सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२६३३२९ वर संपर्क साधावा.

----------------------------------

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

Post a Comment

Previous Post Next Post