लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला, गणेशोत्सव पाकिस्तानात हि साजरा होतो. महाराष्ट्रातील सत्संग परिवार व मराठी हिंदू सेवा संघ यांनी केले कराची येथील मंदिरात गणेश स्थापना.

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या पाचशेहून अधिक मराठी नागरिकांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव थाटात साजरा केला. महंमद अली जीना मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीनंतर श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी भक्तिभावाची साद घालत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

फाळणीपूर्वी पाकिस्तान भारताचाच भाग होता आणि कराची हे मुंबई इलाक्यात येत होते. कराचीत त्यावेळी हजारो मराठी कुटुंबे वास्तव्यास होती. फाळणीनंतर त्यातील बहुतेक कुटुंबे भारतात आली; पण शेकडो कुटुंबे पाकिस्तानात, खास करून करचीतच राहिली. त्यात कृष्णा नाईक यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.

कृष्णा नाईक हे मूळचे कोकणातील. त्यांनी तेथे गणेशोत्सवास प्रारंभ केला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र सुनील नाईक व राजेश नाईक यांनी गणेशोत्सवाची परंपरा पुढे कायम ठेवली.

पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या पाचशेहून अधिक मराठी नागरिकांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव थाटात साजरा केला. महंमद अली जीना मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीनंतर श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशी भक्तिभावाची साद घालत गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

----------------------------------

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

🪀📲व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

Post a Comment

Previous Post Next Post