खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | भुसावळ: दिनांक 02/12/2024 रोजी दुपारी 14.00 ते रात्री 22.00 च्या दरम्यान भुसावळ येथील सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनीमध्ये राहणाऱ्या श्री. अनिल हरी ब-हाटे (वय 64) यांच्या घरफोडीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने लोखंडी खिडकी तोडून घरात प्रवेश केला व 33 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2,60,000/- रुपये रोख असा एकूण 28,55,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस नेला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 331(4), 331(3), 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची उकल व आरोपीची कबुली:
भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाला तपासादरम्यान गुप्त माहिती मिळाली की फिर्यादींचा जावई, राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव) हा कर्जबाजारी झाल्यामुळे घरफोडीचा संभाव्य संशयित आहे. तपास पथकाने तात्काळ राजेंद्र झांबरे याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्या कबुलीनुसार, चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 23 तोळे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2,60,000/- रुपये रोख असा 21,05,000/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला. तसेच, उर्वरित 100 ग्रॅम सोन्याचे दागिने (7,50,000/- रुपये किमतीचे) चोरी केल्याचीही कबुली दिली असून त्या मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत.
संपूर्ण मुद्देमाल हस्तगत:
तपासादरम्यान एकूण 28,55,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
कार्यवाहीतील अधिकारी व कर्मचारी:
ही कार्यवाही जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, व उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, तसेच पोलीस कर्मचारी विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा आणि अन्य पथक सदस्यांनी केली.
पोलीस यंत्रणेच्या जलद व प्रभावी कार्यवाहीमुळे मोठ्या घरफोडी प्रकरणाचा छडा लागताच परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
क्राईम