खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | राज्यातील महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने "लाडकी बहीण" योजनेसाठी डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.
महिलांचा सवाल आणि विरोधकांची टीका
गेल्या काही दिवसांपासून लाभार्थी महिलांसह विरोधकांकडून सरकारला विचारणा केली जात होती की, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महिलाही या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते की, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील.
डिसेंबर हफ्त्याचा अपडेट
लाडकी बहीण योजनेसाठीचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांना लाभ दिला जाईल, तर उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे देण्यात येणार आहेत.
प्रक्रिया आजपासून सुरू
हफ्ता जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात या योजनेचा हप्ता जमा झालेला दिसेल.
लाभार्थी महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळत आहे. सरकारने वेळेत हा निर्णय घेतल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743-
--------------------------------
