खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव : जय गणेश मंडळ नेहरू चौक मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम
गेल्या नऊ वर्षापासून जळगाव शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जय गणेश मित्र मंडळ तसेच अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे गण नाम परिवार सदस्य यांनी आज 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी ७:३० वाजता मोहाडी रोड येथील संत गजानन महाराज मंदिरापासून ते पद्मालय पर्यंत पायी वारी करून वारीचे दहा वर्षे पूर्ण केले सदर या पाई वारीमध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी युवक व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वारीचे स्वागत शिरसोली येथील ललित लोकचंदानी आणि व त्यांच्या परिवाराच्या वतीने तसेच चॉकलेट फॅक्टरी, व म्हसावद येथील MSEB ऑफिस येथील कर्मचारी बांधवांच्या वतीने वारीमध्ये सहभागी झालेल्या १९० भाविकांना नाश्ता चहा देऊन त्यांचे स्वागत केले व या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या आरती करण्यात आली या ठिकाणी उपस्थित वारीतील सदस्यांनी संत गजानन व गणरायाचे नामस्मरण केले सायंकाळी ६ वाजता सदर वारी पद्मालय येथील गणपती मंदिरात पोहोचून तेथे महाआरती करून या वारीचा समारोप करण्यात आला वारीमध्ये निवाणी पायदळ वारी केलेल्या दांपत्याला आरतीचा मान देऊन वारी संपन्न झाली या वारीसाठी राहुल तोडा हेमंत शर्मा ,भोला महाराज पद्मालय देवस्थानचे अध्यक्ष सचिव यांचे सहकार्य लाभले.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
पायीवारी