भाजप मंडळ क्रमांक १ तर्फे आयोजित सदस्य नोंदणी अभियान व जळगाव शहराचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या सत्कार कार्यक्रमात या कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी आमदार राजुमामा भोळे व उज्वलाताई बेंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस उपाध्यक्षा योगिताताई शुक्ल, अमिनाताई तडवी, रत्नाताई बागुल, सुमनताई मराठे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुजनाताई पवार, कविताताई माळी, शानुबाई भोई, मुशीर दादा तडवी, दिपक नाझरकर, भुषण सांगोरे यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची सदस्य नोंदणी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
यावेळी भाजप जेष्ठ नेते सुभाष तात्या शौचे, मंडळ १ चे अध्यक्ष संजय भाऊ शिंदे, नगरसेवक राजू भाऊ मराठे, अनुसूचित जमाती मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे, सरचिटणीस जहांगीर भाई खान, उन्मेश भाऊ देशपांडे, महेश भाऊ चौधरी, दिनेश भाऊ पुरोहित, मिडिया प्रमुख मनोज भांडारकर, दिलीप भाऊ नाझरकर, ज्योती ताई राजपूत, संगीता ताई पाटील, प्रसाद शुक्ल, हरीश भाऊ सोनवणे, वासिम भाई शेख आणि अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपच्या या सदस्य नोंदणी अभियानाने पक्ष संघटनात मोठी भर पडली असून, शहरात पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------