खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: काथार फ्रेंड सर्कलतर्फे आयोजित भरीत पार्टीला समाज बांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व बांधवांशी संवाद साधणे होता. विविध आधुनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या बांधवांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून फ्रेंड सर्कलच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला.
भरीत पार्टीच्या यशस्वी आयोजनासाठी फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी अपार मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीचे चीज बांधवांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाले. कार्यक्रमात विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमधील फ्रेंड सर्कलच्या योगदानाची माहिती देण्यात आली. रक्तदान शिबिरे, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, तुकाराम बीज उत्सव, रथोत्सवातील चहा वाटप, स्विमिंग प्रशिक्षण शिबिर, तसेच वर-वधू परिचय मेळावा यांसारख्या उपक्रमांनी फ्रेंड सर्कलने समाजात भरीव योगदान दिले आहे.
जळगावचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांची सदिच्छा भेट
या कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली, ती जळगावचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांची उपस्थिती. त्यांच्या आगमनाने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
राजू मामा भोळे यांनी आपल्या भाषणात म्हटले:
"काथार फ्रेंड सर्कलने समाजासाठी जे उपक्रम राबवले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. तरुणांच्या उन्नतीसाठी आणि समाजातील एकतेसाठी असे उपक्रम सातत्याने सुरू राहिले पाहिजेत. माझे आशीर्वाद आणि सहकार्य सदैव तुमच्यासोबत आहे."
त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सदस्य व युवा वर्गाला प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्यांनी फ्रेंड सर्कलचे कौतुक केले आणि भविष्यकाळात अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
आभार व भविष्यकालीन योजना:
आयोजकांनी भरीत पार्टीत प्रतिसादासाठी समाज बांधवांचा सक्रिय सहभाग मिळाल्याने आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.आतापर्यंत रक्तदान, अन्नदान, तसेच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये फ्रेंड सर्कलने भक्कम योगदान दिले आहे व ते पुढेही सुरू राहील.
तसेच भविष्यात रोजगार मेळावा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम यासाठी फ्रेंड सर्कलने योजना सादर केल्या.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
काथार वाणी समाज