एसटी बसचा ताबा सुटल्याने, बस थेट इलेक्ट्रिक खांबावर जाऊन धडकली; मोठा अनर्थ टळला.

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | धरणगाव : तालुक्यातील दोन गावांजवळील स्मशानभूमीच्या नजीक शुक्रवारी, १३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता एक भीषण बस अपघात झाला. लाडली गावातून जळगावकडे जात असलेल्या बसचे ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर धडकली. सुदैवाने, बस नाल्यात पडली नाही, परंतु इलेक्ट्रिक खांबावर धडकून मोठा अपघात टळला. या अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांसह २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

बस क्रमांक (एमएच १४ बीटी २८८७) लाडली गावातून ५.३० वाजता निघाली होती. बसमध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी होते. अपघाताच्या वेळी बसचा चालक अशोक जगन्नाथ पाटील (५६) यांचा बसवरील ताबा सुटला. घटनास्थळी गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमींची नावे:
1. मयुरी पाटील (१४)
2. आधार सोनवणे (४५)
3. लावण्या सोनवणे (११)
4. सायली पाटील (१५)
5. हर्षा पाटील (१३)
6. गुंजन सपकाळे (१६)
7. जनाबाई पाटील (५५)
8. अजय पाटील (१३)
9. कुंदन पवार (१३)
10. सुनीता भिल (४६)
11. काजल पाटील (१५)
12. मोहिनी शारद पाटील (१७)
13. भावना शांताराम पाटील (१६)
14. अशोक जगन पाटील (५७)
15. वालात्री शंकर शिरसाट (५३)
16. कुणाल गुंजाळ पवार (१३)
17. रेखाबाई विशाल दांडेकर (२५)
18. जिजाबाई पंढरीनाथ पाटील (६२)
19. पंढरीनाथ आत्माराम पाटील (६७)
20. जगन भीमराव पवार (४२)
21. विश्वनाथ सदाशिव पाटील (७१)
22. निखिल सुधाकर पाटील (२३)
23. तन्मय मंगल पाटील (१९)
24. गुंजन सुनील पाटील (१४)
25. विवेक छगन पाटील (१७)
26. राम शरद अवचिते (१३)
27. जयेश चंद्रकांत पाटील (१६)
28. सायली सुरेश पाटील (१७)

या अपघातामुळे धरणगाव व आसपासच्या गावांमध्ये मोठी खळबळ माजली असून, गावकऱ्यांनी घटनास्थळी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post