जळगावातील कांचननगरमध्ये दोन गटांमध्ये गोळीबार; एक ठार, दोघे जखमी

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील कांचननगर परिसरात रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून शहरात दहशत माजवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच एमआयडीसी परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच, रविवारी (दि. ९) रात्री कांचननगर भागात पुन्हा एकदा गोळीबार झाला.

पूर्ववैमनस्यातून सुरू झालेला वाद चिघळत गेला आणि अखेर त्याचे रूपांतर गोळीबारात झाले. या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर (वय २८), गणेश रविंद्र सोनवणे (वय २६) आणि तुषार सबसिंग सोनवणे (वय २६, तिघेही रा. कांचननगर, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांपैकी दोघांची नावे समोर आली असून अधिकृत माहिती अद्याप पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, एलसीबीची विशेष टीम संशयित आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहे. या घटनेनंतर जळगाव शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post