खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून भाजपने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांचा समावेश असून राज्यभरातून भाजपने आपल्या प्रमुख नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील निवडणूक लढतीत लक्षवेधी असलेल्या काही नावांची यादीत घोषणाही करण्यात आली आहे.
भाजपकडून संजय सावकारे यांची उमेदवारी जाहीर
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून भुसावळ मतदारसंघातून संजय सावकारे यांची उमेदवारी पुन्हा एकदा घोषित करण्यात आली आहे. संजय सावकारे हे भुसावळमधील प्रतिष्ठित नेते असून त्यांनी या मतदारसंघातून आधीही निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि लोकसंपर्कात असलेल्या प्रभावामुळे त्यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे.
जामनेर आणि चाळीसगावची उमेदवारी जाहीर
जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा भाजपने उमेदवारी दिली आहे. महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून राज्यात त्यांची राजकीय पकड आहे. तसेच चाळीसगाव मतदारसंघातून मंगेश चव्हाण यांना देखील उमेदवारी मिळाली आहे.
सुरेश भोळे पुन्हा रिंगणात
जळगाव शहराच्या आमदारकीसाठी सध्या विद्यमान आमदार सुरेश भोळे उर्फ राजू मामा यांची उमेदवारी तिसऱ्यांदा जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या उमेदवारीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. भाजपच्या काही अंतर्गत चर्चांमध्ये देखील याबाबत संभ्रम असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली.
राजू मामा हे जळगाव शहरासाठी सक्रिय राहून विविध विकासकामे पार पाडत आले आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरात महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन झाले आणि विविध योजनांद्वारे नागरीकांना लाभ मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
आगामी निवडणुकीत मोठी लढत राजू मामा यांची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपकडून महत्त्वपूर्ण उमेदवारांच्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------