खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
जळगाव प्रतिनिधी | नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरांमध्ये आ. राजूमामा भोळे मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात मंदिर परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून, भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
आजच्या पांढऱ्या रंगाच्या निमित्ताने आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले, "धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपणे आणि स्वच्छता राखणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे भाग्य लाभले याबद्दल मी सेवक म्हणून आपला ऋणी आहे." तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देत जळगाववासीयांनी यात सक्रिय सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेत मेहरूण, पिप्राळा, दाणा बाजार, महाबळ, निमखेडी रोड, आणि जुने जळगाव परिसरातील विविध देवींच्या मंदिरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. भाविकांनी आ. राजूमामा भोळे आणि त्यांच्या टीमचे यासाठी विशेष आभार मानले.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------