चिंचोली येथील नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिरात 500 रूग्णांची तपासणी ; गुलाबराव पाटील यांनी केली रुग्णांचे विचारपूस !

95 रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेलला केले रवाना ! 

खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार |
जळगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जीपीएस मित्र परिवार व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंचोली येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक तपासणीसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच यातील 95 रुग्णांना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले. 


चिंचोली येथील साईबाबा मंदिरात जीपीएस मित्र परिवारातर्फे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कुसुंबा, चिंचोली, धानवड, उमाळे, रायपूर, कंडारी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली येथील नागरिक नेत्र तपासणी व ऑपरेशनसाठी आले होते. यावेळी 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि 95 रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल येथे रवाना करण्यात आले आहे. रुग्णांना पनवेल येथे पाठवीत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णांची विचारपूस केली.

याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवराज पाटील, धरणगाव तालुका प्रमुख शमुकुंदराव नन्नवरे, शिवसेना उपतालुका प्रवीण परदेशी, उपतालुकाप्रमुख राजू पाटील, तालुका समन्वयक देविदास कोळी, युवासेना उपतालुका प्रमुख अतुल घुगे, जेष्ठ शिवसैनिक नारायण अप्पा, धानवडचे सरपंच संभाजी पवार, चिंचोलीचे सरपंच किरण घुगे, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास बिराडे, ग्रा पं सदस्य जीतू पोळ, ग्रा पं सदस्य हरीलाल शिंदे, उपसरपंच संजय राठोड, नाना पवार, बबलू देशमुख, योगेश सोनवणे, भाजपचे विलास घुगे, प्रवीण पाटील, विलास सोनवणे, आकाश पाटील युवा सेना यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते.

----------------------------------

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------

पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------


Post a Comment

Previous Post Next Post