खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार I आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांनी आज दि. २५ रोजी जळगाव मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल करुन जोरदार शक्ती प्रदर्शन केला.
अर्ज दाखल करताना पाटलांनी शहरात शक्ती प्रदर्शन केले, ज्यात त्यांच्या समर्थकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली. मोठ्या रॅलीद्वारे शहरातील प्रमुख मार्गांवरून जात, कुलभूषण पाटलांनी शक्ती दाखवली. समर्थकांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडला.
या रॅलीत हजारोंच्या संख्येने समर्थक उपस्थित होते. पाटलांच्या या शक्तिप्रदर्शनामुळे निवडणुकीतील वातावरण तापले असून, विरोधकांच्या चिंतेत भर पडली आहे.
Tags
राजकीय