खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी दि. 28| महा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 11 ते 14 नोव्हेंबर 2024 नागपूर येथे घेण्यात येणाऱ्या युवा गटाच्या मुले व मुली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर बास्केटबॉल स्पर्धेत जळगाव जिल्हा संघ सहभागी करण्यासाठी आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ येथे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील युवा गटाच्या बास्केटबॉल खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. सदर जिल्हा संघ निवड चाचणीमध्ये पन्नास मुले व पंधरा मुली सहभागी झाल्या होत्या सहभागी झालेल्या खेळाडूंमधून अंतिम बारा मुले व चार अतिरिक्त मुले खेळाडू आणि अंतिम बारा मुली आणि तीन अतिरिक्त खेळाडूंची निवड करण्यात आली निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमधून चार मुले व चार मुली खेळाडू बी.एफ.आय. तर्फे 4 ते 7 नोव्हेंबर दरम्यान माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संघ निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे.
मुले संघ-
देवेश पाटील,धैर्यशील पाटील,अवनीश चौधरी,वेदांत डोंगरे,भूमेश बऱ्हाटे,लोनेश पाटील,सौम्य किस्स्वानी,चैतन्य पवार,लक्ष पाटील,दिनेश पाटील,साहिल ब्राह्मणे,प्रेम बडगुजर.
मुली संघ
डेलीशा पाटील,श्रेया बिराडे,भूमिका खडके,नंदिनी वंजाळे,मृण्मयी पाटील, जीवीशा साकला,निवेदिता ढेकळे,नूतन पाटील,मारिया घासलेटवाला, परवणी तायडे,वेदिता जोशी
संघ निवड चाचणीचे उद्घाटन प्रसंगी डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळच्या मुख्याध्यापिका सौ.अनघा पाटील आणि जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव श्री जितेंद्र शिंदे उपस्थित होते उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री विनय काळे यांनी केले तसेच 16 वर्षाआतील संघ निवड समिती म्हणून जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव श्री जितेंद्र शिंदे श्री आशिष पाटील (राष्ट्रीय खेळाडू) श्री विनय काळे (राज्यपंच) श्री पंकज तायडे (वरिष्ठ खेळाडू) यांनी काम पाहिले.
जळगाव जिल्हा सोळा वर्षातील संघ निवड चाचणी यशस्वी होण्यासाठी याकूब शेख, मंदार पवार,नागराज राजपूत,ललित रडे,सुरज भंगाळे,रितेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------
Tags
खेळ